आमच्याबद्दल

This is
SSV Agrotech

सध्या सर्व प्रकारच्या शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर सर्रास केला जात आहे यामधे भाजीपाला फळे ऊस यासारख्या पिंकाचा समावेश आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतकरयांनी प्रगती केली असली तरी या सर्वांचा जमिनीवर वातावरणावर खुपच वाईट परिणाम दिसु लागले आहेत. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीमधे त्याचप्रमाणे अन्नामधे कस राहिला नाही, याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर त्याचप्रमाणे निर्सगावर दिसु लागले आहेत.
आज प्रत्येक घरामध्ये एकाला तरी डायबेटीस ब्लडप्रेशर आणि प्रामुख्याने कॅन्सर या रोगांनी ग्रासले आहे यामधे गव्हरमेंटने पंजाब मधुन खास कॅन्सरच्या पेशंटसाठी रेल्वे चालु केली आहे येथे रासायनिक खतांचा वापर खुप मोठया प्रमाणावर केला जात आहे. सांगायचा मुददा हाच आहे की रासायनिक खतामुळे मानवाच्या त्याचप्रमाणे पशुपक्षांच्या जीवनावर परिणाम होताना दिसुन येत आहे.
रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिन नापिक होवु लागली आहे काही ठिकाणी तर या खतांच्या वापरामुळे क्षारांचे थर जमा झाले आहे. त्यामुळे उत्पादनामधे खुप घट झाली आहे व खर्चपण वाढला आहे. रासायनिक खतांचा वापर असाच होत राहिला तर काही काळाने जमिनी असुनही शेतकरी मित्रांना शेती करण्यायोग्य शेती राहणार नाही. पुर्वीच्या काळी आपले वंशज हे जैविक शेती करायचे त्यामध्ये रासायनिक खतांचा वापर होत नव्हता त्यामुळे कमी खर्चामध्ये जास्त व उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन भेटत होते व त्यावेळी सकस आहारामुळे त्यांचे आरोग्यपण खुपचांगले होते पण आता खुप बदलले आहे.



Scroll To Top
Close
Close
Shop
0 Wishlist
0 Cart

Shopping Cart

Close

Shopping cart is empty!

Continue Shopping